———————
मूळ विचार: इंग्रजी पावसाळ्याची वाट पाहता पाहता आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर पावसाची वाट पाहणे, निदान इथे उष्णकाटिबंधीय वातावरणात तरी. मला नेहमी प्रश्न पडतो की आपण नेमकी कसली वाट पाहत आहोत? आपण पावसाची वाट पाहतो का? आपण आजच्यापेक्षा चांगलं असेल अशा उद्याची वाट पाहतो का? आपण काहीतरी चांगलं होईल यांची वाट पाहतो का? आपण कोणीतरी आपल्याला आशा देईल याची वाट पाहतो का? कदाचित असेलही तसे! आपल्याला जीवंत राहण्यासाठी काय लागतं? आपल्याला आशा/उमेद हवी असते. आपण आपल्या सगळ्या सर्वोच्च अपेक्षांचा विचार केला तर जाणवतं की आपल्याला काहीतरी अधिक चांगलं होईल ही एकंच अपेक्षा सतत असते. मी असं नाही म्हणणार की मी सर्वार्थाने समाधानी आहे. कधीकधी जेव्हा आपण एका अर्थाने समाधानी असतो, आपल्या आत असं काहीतरी असतं जे आपल्याला सांगत असतं की आपण अजून काहीतरी चांगलं होऊ शकतं त्याची वाट पहिली पाहिजे. आणि “अजून काहीतरी” म्हणजे काय हे सांगणारे शब्द कधीच नसतात. ते काहीही आणि कोणीही असू शकतं. ते एखादी चांगली नोकरी किंवा एखादा चांगला फोन असू शकतं. ते अधिक चांगलं जग किंवा एखादा चांगला दिवस असू शकतं. लहान किंवा मोठं काहीही असेल तरी “चांगलं” असण्याची सापेक्षता आणि “अधिक चांगलं” असण्याची अपेक्षा आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन जात असते. आपल्याला ठाऊक नसतं की आपण कुठे चाललो आहोत. आपण स्वतःला सांगत राहतो की उद्या आजच्या पेक्षा चांगला असेल. उद्या जेव्हा आज होतो, आपण स्वतःला सांगतो की येणारा उद्या ह्यापेक्षा जास्त चांगला असेल. “जर असं केलं तर..” आणि “ह्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं” याच्या शोधात आपण सतत पुढे जात राहतो. आपण जे काही नवीन सापडत जातं त्याला अधिक चांगलं म्हणतो आणि लगेच ते टाकून त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं कधीतरी मिळेल त्याच्यापाठी धावत सुटतो. हे चक्र आहे आणि आपण वागतो तेही. आपण चढतो आणि पडतो! आपण तुटतो आणि जोडले जातो! आपण दुःखातिरेक आणि आनंद उपभोगतो! आपण असतो आणि आपण नसतो! या सततच्या चक्राला सलाम! ब्रह्मांडाला सलाम! ————— मूल विचार: अंग्रेजी बारिश कि राह ताकना हम सब ने ये किया हैं। झुलसाती हुई गर्मी के बाद आनेवाले ठंडी ठंडी बारिश कि राह ताकना, खासकर इस उष्णकटिबंधीय वातावरण में। मैं कई बार सोचती हूँ, कि हम असल में किसकी राह तक रहें हैं। क्या हम बारिश कि राह तक रहें हैं? क्या हम बेहतर कल कि राह तक रहें हैं? क्या हम कुछ भी अच्छा होने कि राह तक रहें हैं? क्या हम उम्मीद कि राह तक रहें हैं? शायद!! हमें जिंदा रहने के लिए किसकी जरूरत हैं? बस एक चुटकी उम्मीद!! अगर हम हमरें बड़े से बड़े अपेक्षाओं को देखें तो समझेंगे कि हमें बस कुछ इससे बेहतर की अपेक्षा हैं। मैं यह नहीं कह रहीं कि में पूरी तरह से संतुष्ट हूँ। कभीकभी जब हम संतुष्ट हैं ऐसा हमें लगता हैं, हमरें अंदर से ऐसा कुछ हैं जो हमें कुछ अधिक अच्छे के लिए आगे बढ़ने के लिए मानो मजबूर ही करता हैं। और ये जो कुछ “कुछ अधिक” हैं, उसे परिभाषित करने वाले शब्द कभी नहीं होते। ये कुछ भी और कोई भी हो सकता हैं। ये एक बेहतर नौकरी या फिर एक बेहतर फोन हो सकता हैं। ये एक बेहतर दुनिया या फिर एक बेहतर दिन हो सकता हैं। छोटे किंवा मोठे, “अच्छे” कि सापेक्षता और “बेहतर” कि अपेक्षा हमें कहीं ना कहीं आगे जाने के लिए प्रभावित करती हैं। हम कहा जा रहें हैं हमें नहीं पता होता। हम बस अपने आप को कहते रहते हैं कि कल बेहतर होगा। जब कल आज में तपदिल होता हैं, हम खुद को समझाते हैं कि आने वाला कल इस कल से भी बेहतर होगा। “ऐसा होता तो” और “इससे ज्यादा और बेहतर” कि तलाश में हम आगे बढ़ते रहते हैं। जो कुछ आगे होता हैं उसे हम बेहतर कहते हैं और लगभग तुरंत ही उसे छोड़कर उससे ज्यादा कुछ और बेहतर जो कभी मिलेगा उसकी और बढ़ते चले जाते हैं। ये एक चक्र हैं और हम भी। हम बढ़ते हैं और गिरते हैं। हम टूटते हैं और जुडते हैं। हम दुःख और सुख के परमोच्च क्षण अनुभव करते हैं। हम हैं और हम नहीं। इस चक्र को सलाम! ब्रह्मांड को सलाम!