एक माडाचं झाड पुरे असतं: A lone palm tree is enough

मूळ विचार भाषा: मराठी

 

एक माडाचं झाड पुरे असतं

किनाऱ्याची सय यायला

कधीकधी थोडं विसावायला

कधी थोडं बागडायला

कधी उगीच झाडावर चढायचा

व्यर्थ प्रयत्न करायला

खरंच एक झाड पुरे असतं आपल्याला ही आठवण करून द्यायला कि ज्या सिमेंटच्या जंगलात आपण राहतो ते काही खरं जंगल नव्हे. खऱ्या जंगलात झाडं असतात, प्राणी असतात, शांतता असते, स्थिरता असते… सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोकळेपणा असतो. तिकडे चालायचे रस्ते आपले आपल्याला बनवावे लागतात आणि ते रस्ते चूक किव्वा बरोबर नसतात. ते फक्त रस्ते असतात आपण आपल्यासाठी बनवलेले.

कलेचं आणि माझं नातं काहीसं असंच आहे. अर्थात कलेविषयी मी बोलणं म्हणजे जमिनीवर रेंगाळणाऱ्या गवताने क्षितीजाच्या सौंदर्याविषयी बोलण्यासारखं आहे. पण गावातमध्येही जमिनीचं पोट फाडून जिद्दीने सूर्याकडे जायची ओढ असतेच ना! मग हेही मीही गवताच्या जिद्दीने कलेकडे पाहते आणि मला जसं जमेल तसं समजून घेते. आजपर्यंत मी अनेक चित्रप्रदर्शने पहिली, गाण्याच्या कार्यक्रमांना गेले, नाटक आणि चित्रपट पहिले, वाद्य आणि वाद्य वाजवणाऱ्यांचे कार्यक्रम ऐकले आणि नृत्येही पहिली. एकूणच माझ्या परीने मी कलेचा आस्वाद घेत आले. प्रत्येक कलाकृतीकडे पाहताना मनात वेगवेगळे विचार येत राहिले. काही गोष्टींचे अर्थ लागले आणि काही गोष्टी तशाच पडून राहिल्या मनाच्या कोपऱ्यात धूळ खात. पण आजही आठवते ती सायकल.

मी एकदा मुंबईतल्या एका आर्ट गॅलरीत चित्रांच्या प्रदर्शनासाठी गेले होते. सकाळी वर्तमानपत्रात वाचला होतं कि राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या चित्रांचं प्रदर्शन होतं. मी नुकतीच कॉलेज ला जायला लागले होते. फार उत्साहाने मी ते प्रदर्शन पाहायला गेले. माझी एक मैत्रीण येणार होती सोबत. आयत्या वेळी तिचं येणं रद्द झालं. त्या दिवशी मी बरीच चित्र पहिली. फार छान असावीत. असावीत यासाठी म्हणते कि आता त्यातील फारशी चित्र लक्षात नाहीत. पण त्या वर्तुळाकार सभागृहातील बरीचशी चित्र पाहून मी एका चित्रापाशी येऊन थांबले. मातकट, पिंगट आणि केशरी रंगाच्या बॅकग्राऊंड वर एका सायकल चं चित्र काढलेलं होतं. साधंच पण फार देखणं. आज १० – ११ वर्षांनंतरही ते चित्र तसंच्या तसं आठवतं मला.

सायकल!! एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणारं एक साधं वाहन.

माझा प्रवास त्या सायकल पासून सुरु झाला. मला माहित नसलेल्या जगात या चित्राने मला प्रथम प्रवेश मिळवून दिला.

असंच मला फार लहानपणी आवडलेलं एक पुस्तक होतं शांतिनिकेतन या पश्चिम बंगाल मधील ठिकाणाविषयी. त्या पुस्तकामुळे मी प्रवास करायचा असं ठरल्याबरोबर तिकडे शांतिनिकेतनात जायचं ठरवलं. ती तर कलेची मातृभुमीच म्हणायला हवी. पण मी पश्चिम बंगाल ला जाण्यासाठी शांतिनिकेतनाइतकाच महत्वाचं कारण होतं सुंदरबन. तिकडच्या प्राणी आणि घनदाट अरण्याविषयी वाचून “इथे जायलाच हवं” असं मी ठरवलं होतं. ते वरच छायाचित्र तिकडे घेतलेलं आहे.

खाली सतत वाहणारं पाणी, वर चमचमणारा सूर्य आणि त्याभोवती आकाशाचा विस्तार… नजर जाईल तोपर्यंत. दूर कुठेतरी त्या क्षितीजाच्या रेषेपाशी पाणी आणि आकाश एकमेकांना भेटताना दिसतात. फार छोटी दिसायला लागते मी स्वतःला अशावेळी. पण मग एखादं झाड दिसतं मातीतून उगवून आभाळापर्यंत जाऊ पाहणारं आणि फार हायसं वाटतं.

म्हणून म्हटलं कि एक माडाचं झाड पुरे असतं…

 

Original thought language: Marathi

Translation in English

 

A lone palm tree is enough

To reminisce in the memory of a seashore

To take a rest-break for a while

To wander about

To make futile effort

To climb on the tree

A single tree is more than enough to remind us that the real jungle is not made of buildings. But the real jungle has trees, animals, peace, stability… and most importantly openness. In a real jungle, we have to pave our own path and the pathways are not right or wrong. They simply are the pathways created by us for ourselves.

My relationship with art is somewhat like that. I am nobody to talk about art though. It would seem like an effort of a lazily growing grass blade talking about the aesthetic beauty of the horizon. But even the grass blade has the tenacity to tear the layers of soil and grow towards the sun. I look at art holding the same kind of energy within me and I try and understand it with all my heart. Till today, I have attended various art exhibitions, singing programs, plays and films, instrumental concerts, dance shows, etc. I tried to enjoy art in my own little way. There would be thousands of thoughts that would cross my mind looking at each art form. I could interpret and understand some of the things and the rest remained a mystery. However, the most unforgettable is the bicycle.

Once I had visited an art gallery in Mumbai for a particular painting exhibition. I had read about it in the morning newspaper. It was an exhibition of paintings which had won prizes at a state level competition. I had just graduated from school and it was my first year at college. At that age, I was very excited to go for the exhibition. One of my friend was going to accompany me but she cancelled it at the last minute. I decided to go anyway. I saw a lot of paintings that day. They must be good. I am saying “must be” because I don’t remember most of them today.

However, in that circular hall, after observing most of the paintings I stopped still in front of a painting. It was a painting of a bicycle on a brownish, yellowish and orange background. It was oh so simple but divinely beautiful. Today, after 10-12 years, I remember the painting with all its details.

Bicycle!! An ordinary vehicle that helps one travel from one place to another.

And with that bicycle I started my journey. This painting opened the doors of a place unknown to me till that day.

As a child, I had read a book about a place called Santiniketan in West Bengal which affected me in a similar manner. That book was reason enough to travel to Santiniketan when I got the opportunity to travel on my own. Santiniketan should be called the motherland of art. However, along with Santiniketan, Sundarbans was another place that made my decision to travel to West Bengal concrete. When I had first read about the biodiversity of animals and the thick forests in Sundarbans, I had promised myself that “I have to visit this place.” The photograph you can see above is taken there itself.

The eternally flowing water, the sparkling sun and the sky spread around… as far as one can see. Somewhere at a distance, one can see that the water and the sky are meeting each other on the horizon. At such moments, I look like a small dot to myself. Then, looking at a tree sprouting from the soil and trying to meet the sky, I breathe a sigh of relief.

 

That’s the reason even a lone palm tree is enough…

 

 

原文:マラティ語

 

一本だけポツンとあるヤシの木で十分。

海辺の記憶を辿るには。

少しの時間、休むには。

ぼんやりするには。

不毛な努力をするには。

木に登るには。

一本の木があれば、本物の森は建物たちによって成り立つわけじゃないと思い出すのに十分事足りる。本物の森には木々、動物、平穏、恒常性、そしてなにより大事な寛容さがある。本物の森の中では自分の道を切り開かなければならない。そして、その道は「正解か」「間違いか」というものではなく、ただ単に私たちが作り上げた私たちのための道でしかない。

私自身、アートについて語れるような人じゃないのだけれど、私とアートの関係はそれと似ている。のらりくらりと成長する草の葉が、地平線の美しさについて話をしようとしているかのような。だけど、草の葉といえども、幾重もの土の層を越えて太陽のもとへと育っていく粘り強さをもっている。私はそれと同じエネルギーを携えながらアートを見る。そしてアートを全身全霊で理解しようと試みる。今日までいくつかのアートの展覧会や歌のプログラム、演劇、映画、器楽のコンサート、ダンスショーに参加してきた。私は自分なりの方法で楽しもうとしてきた。それぞれのアート作品を見るごとに、幾千もの考えが頭をよぎったことだろう。そのうちのいくつかを自分なりに解釈し、理解してきたけれどまだ謎として残っているものもある。その中で一番忘れられないのは、あの自転車だ。

ムンバイのギャラリーにとある絵の展覧会を見に行ったときのことだ。その日の朝の新聞で紹介されていた、州レベルの展覧会で賞をとった絵のエキシビションだった。高校を卒業したてで、大学1年生の時だった。当時、その展覧会に行きたくて仕方がなかった。友達の一人が一緒に行く予定だったのだけれど、直前に行けなくなってしまって・・・でも、一人で行くことにした。その日はかなりたくさんの絵を見た。どれも良かったにちがいない。“ちがいない”というのは、もうあまり覚えていないからなのだけど。

でも、円形のホールの中でほとんどの絵を見終わった後、一枚の絵の前で足を止めた。茶色と黄色とオレンジの背景に描かれた自転車だった。とてもシンプルで、でも神々しいくらいにきれいだった。10−12年後の今、その絵の細かいところまで思い出せる。

自転車!!ある場所から別の場所へ移動する普通の乗り物。

その自転車で私は自分の旅を始めた。この絵はその日まで私が知らなかった場所へのドアを開いてくれた。

子どもの頃、その自転車の絵と同じように私に影響を与えた西ベンガル州のシャンティニケタンという場所についての本を読んだ。一人旅に出かける機会を得たとき、シャンティニケタンへ行こうと決めたのはその本のおかげだ。シャンティニケタンはアートの発祥地ともいわれるべき場所。同時に、スンダルバンズ(Sundarbans)も西ベンガルへ旅に出ることを決める要因になった場所だ。私が初めてスンダルバンズの生物多様性と奥深い森についての本を読んだとき、私はここへ必ず行く、と心に決めた。このブログの上部にある写真はそこで私が撮影したもの。

絶え間なく流れる水、太陽のはじけるばかりの輝きとどこまでも広がる空。少し距離を置いて眺めると、空と海が水平線で混ざり合うところが見える。その瞬間、自分が一粒の点のようなものだと気付いた。だから土から芽吹き空へ必死で伸びていく木をみると、安堵のため息がでる。

それが、一本だけ生えているヤシの木で十分、と思う理由。

3 Replies to “एक माडाचं झाड पुरे असतं: A lone palm tree is enough”

  1. “to pave our own path and …..there is no right or wrong”- this sentence struck a chord within me…loved the analogies…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s